बातमीपत्र पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरातील २८५ दिव्यांगांना निधीचे वाटप

Pandharpur Live : 
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने पंढरपूर शहरातील २८५ दिव्यांगांना नगरपरिषदेच्या निधीमधुन प्रत्येक दिव्यांगांना प्रति ४६००/- प्रमाणे एकुण १३ लाख ११ हजार रुपयांचा निधी, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्षा उपनगराध्यक्ष लतिका डोके, माजी नगराध्यक्ष स्थायी समिती सदस्य दगडु धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष स्थायी समिती सदस्य वामनतात्या बंदपट्टे, सुजितकुमार सर्वगोड भाग्यश्री शिंदे, करुणा आंबरे, रेहाना बोहरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत निधीचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी नगरपरिषदेने शहरातील दिव्यांगासाठी दिव्यांग कल्याण निधीची तरतुद करुन अंदाजपत्रकाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांगासाठी राखीव ठेवुन शहरातील २८५ दिव्यांग व्यक्तिंना प्रत्येक दिव्यांगांना प्रति ४६००/- प्रमाणे एकुण १३ लाख ११ हजार रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. तसेच यापुढेही भविष्यात शहरातील दिव्यांगांना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व आर्थिक मदत करुन त्यांचे जिवनमान उंचविण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील.



_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments