पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे भाळवणी येथे श्रमदान शिबिर




○ २० ते २६ जानेवारी दरम्यान होणार विशेष श्रमसंस्कार शिबिर
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भाळवणी येथे ७ दिवशीय शिबिराचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
      या शिबिराचे उदघाटन सोमवार दिनांक २० जानेवारी सरपंच जयश्री शिंदे, प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, सोमनाथ नवले, उपसरपंच अंबादास कुचेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घाडगे, हरीभाऊ शिंदे, भगवान चौगुले, दिपक गवळी, पोलिस पाटील अर्जुन गवळी, नवले गुरूजी, प्रशांत देशमुख, ग्रामसेवक प्रशांत कुंभार, प्रा. चंद्रकांत देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंहगड काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे हे होते. हे शिबिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ७ दिवस चालणार आहे. शिबिर उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, गटविकास अधिकारी रविकिरण घाडगे, प्रशांत देशमुख आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान गावातून विद्यार्थ्यांनी फेरी काढून मुली वाचवा देश वाचवा अशा घोषणा देऊन समाज जागृतीचा संदेश दिला.
या शिबिरामध्ये अनेक विषयांवर समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असुन मुली वाचवा देश वाचवा- प्रा. चंद्रकांत देशमुख, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व वृक्षदान-सुदाम वसेकर, सेंद्रिय शेती काळाची गरज, विषमुक्त अन्न-हणमंत यादव, व्यक्तिमत्व विकास व अध्यात्म-रामचंद्र शेळके, २४ जानेवारी रोजी शैक्षणिक प्रबोधन- गुरूराज इनामदार, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता- अँड. विलास शिंदे, समाजप्रबोधन पर पथनाट्य
दुपारी १२ वाजता समारोप होणार आहे. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील ९५ हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमीत इंगोले सह महाविद्यालयातील अनेकस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामपंचायत भाळवणी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments