कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन


Pandharpur Live : 
शेळवे येथील कर्मयोगी इंजिनेरींग महाविद्यालयात सालाबादप्रमाणे याही वर्षी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी दिली. 
सादर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील व उपप्राचार्य प्रा.मुडेगावकर जे.एल. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार गणेश वाळके, क्रीडा शिक्षक प्रा.गणेश बागल, क्रीडा संयोजक प्रा.पांचाळ आर.जे. व प्रा.कुलकर्णी एस.एम., सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्तिथ होते.
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, हॉली बॉल, टग ऑफ वॉर, बॅडमिंटन, चेस, कॅरोम, १०० मी, २००मी , ४००मी. धावणे, लॉन्ग जम्प, डिस्क थ्रो, ट्रिपल जम्प, शॉट पुट, रिले ४ x १०० ईत्यादी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होणे गरजेचे असते त्यासाठी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे प्रत्येक वर्षी केले जाते. सदर स्पर्धेत शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी हि सहभागी झाले होते. 
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तसेच क्रीडा क्षेत्रात करियर करण्याच्या संधी प्राप्त होतात. या क्रीडा स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. 


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments