मैदानी क्रीडा स्पर्धेत स्वेरी पॉलिटेक्निकची दमदार कामगिरी सी-झोनमध्ये आठ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद


Pandharpur Live : 
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे ‘इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशन’, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मुलांच्या विभागीय मैदानी खेळांच्या स्पर्धेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी दमदार यश संपादित करत एकूण पाच विजेतेपद व तीन उपविजेतेपद असे मिळून एकूण आठ पदके मिळवत सी-झोनमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान प्राप्त केला.
          या मैदानी स्पर्धा कर्मयोगी पॉलिटेक्निक शेळवेच्या मैदानावर भरवण्यात आल्या होत्या. या मैदानी स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील पदविका अभियांत्रिकीच्या दहा महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दिपक संभाजी शिंदे हे दोनशे मीटर व चारशे मीटर रनिंगमध्ये विजेते तर १०० मीटर रनिंगमध्ये उपविजेते, मारुती बळीराम पिंपळे हे थाळीफेकमध्ये विजेते, प्रथमेश दीपक यादव हे लांब उडीमध्ये उपविजेते, अक्षय सुभाष तांबे हे भालाफेकमध्ये विजेते,अतुल दादासाहेब साळवे हे गोळाफेकमध्ये विजेते, तर स्वप्निल सुनील जाधव, ओंकार राजेंद्र भोसले, सिद्धनाथ चांगदेव बाबर, मयूर विशाल शेंडे आणि दीपक संभाजी शिंदे हे सांघिक रिले (१०० बाय ४) स्पर्धेमध्ये उपविजेते ठरले. आता या विजेतेपदामुळे २० जानेवारी २०२० रोजी के. व्ही. पी. एस. फार्मसी, बोराडी, ता. शिरपूर, जि.-धुळे याठिकाणी होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी स्वेरीचे हे विजेते स्पर्धक पात्र झाले आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली क्रिडा समन्वयक प्रा. एच. डी. ऐवळे, क्रीडा मार्गदर्शक प्रा. पी. टी. लोखंडे यांच्या सहकार्याने यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. स्वेरीने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच आघाडी घेतली नसून आता या मैदानी स्पर्धेतील विजेतेपदामुळे क्रीडा क्षेत्रात देखील भरारी घेत असल्याचे सिद्ध होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मैदानी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळविणाऱ्या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
छायाचित्र - शेळवे येथे झालेल्या मुलांच्या विभागीय मैदानी खेळांच्या स्पर्धेत स्वेरीच्या पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी दमदार यश संपादित करत एकूण पाच विजेतेपद व तीन उपविजेतेपद असे मिळून एकूण आठ पदकांबरोबर सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्वेरीचे विजेते खेळाडू व महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी. टी. लोखंडे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments