पंढरपूर सिंहगड मध्ये ३ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद उत्साहात संपन्न...मानांकित विद्यापीठातुन २१८ शोधनिबंध सादर


Pandharpur Live : (प्रमोद बनसोडे)कोर्टी (ता. पंढरपूर)  येथील  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २ ते ४ जानेवारी २०२० या कालावधीत ३ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदचे आयोजन करण्यात आले होते ह्या परिषद उत्साहात संपन्न झाल्या असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


   महाविद्यालयाच्या वतीने इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्मार्ट मटेरियल अँड नॅनोटेक्नाॅलाॅजी, इंटरनॅशनल काॅन्फरन्स ऑन सस्टेनेबल इनोव्हेशन्स इन सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि इंटरनॅशनल काॅन्फरन्स ऑन इनोव्हेशन्स इन काॅम्प्युटर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग या शोधनिबंध परिषद संपन्न झाल्या.
    या परिषद मध्ये अग्देर नार्वे विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, झागाझीग युनिव्हर्सिटी इजिप्त चे डॉ. एम. ए. तौफीक, साऊथ कोरिया येथील डाॅ. गिरीश गुंड, हैदराबाद येथील डाॅ. व्ही. एन. मनी, एम. एस. बडोदा विद्यापीठातुन डाॅ. सी. जे. पांचाळ, डाॅ. सी. डी. लोखंडे आदी सह अनेक नामवंत विद्यापीठातील प्राध्यापक सहभागी झाले होते. या परिषद मध्ये विविध नामांकित विद्यापीठातील १४३ पोस्टर प्रेझेटेंशन तर ६५ पेपर प्रेझेटेंशन असे एकूण २१८ शोधनिबंध सादर करण्यात आले होते. यामध्ये आय. आय. एस्सी बेंगलोर व एन. आय. टी. सुरतकल येथील कु. काव्याश्री केरेमाने हिला उत्कृष्ट महिला संशोधक म्हणून गौरवण्यात आले.
    या आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मध्ये सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत असलेले डॉ. अच्छे लाल व कानिक मार्कड यांचा शोधनिबंध "बेस्ट पेपर अॅवार्ड" म्हणून गौरवण्यात आला. या शोधनिबंध मध्ये विमानाच्या व वाहनाच्या निर्मितीसाठी कमी वजनाचे व जास्त क्षमतेने काम करणारे पदार्थ निर्मितीची रचना या विषयी माहिती सादर करण्यात आली. त्या रचनेचे गणित सूत्र त्या माध्यमातून पदार्थाच्या विविध वातावरणामधील प्रतिसाद या विषयावरील निबंध सादर करण्यात आला होता.
या परिषद मध्ये विविध नामांकित विद्यापीठातील १४३ पोस्टर प्रेझेटेंशन तर ६५ पेपर प्रेझेटेंशन असे एकूण २१८ शोधनिबंध सादर करण्यात आले होते. यामध्ये आय. आय. एस्सी बेंगलोर व एन. आय. टी. सुरतकल येथील कु. काव्याश्री केरेमाने हिला उत्कृष्ट महिला संशोधक म्हणून गौरवण्यात आले.  
आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेच्या समारोप प्रसंगी "मटेरियल व सस्टेनेबल डेव्हलपमेंट" या विषयावर पॅनेल चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध पदार्थाचे वापर, मोबाइल कम्युनिकेशन, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असुन ३ ते ४ वर्षांमध्ये या क्षेत्रातील ९५% मटेरियल टाकाऊ होतात. त्याचा पुनर्वापर होण्याची गरज, नैसर्गिक पदार्थाच्या वापराची गरज लक्षात घेऊन पर्यायी पदार्थाची गरज अशा अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चा सञात सीएमईटी लॅबचे डॉ. व्ही. एन. मनी, बडोदा विद्यापीठाचे डॉ. सी. जी. पांचाळ, झागाझीग विद्यापीठाचे डाॅ. एम. ए. तौफीक, शास्त्रज्ञ एल. गिरीबाबू सहभागी झाले होते. या पॅनेल चर्चासञाचे समन्वयक म्हणून डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
     ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. संपत देशमुख, डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. महेंद्र काटकर, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अंजली पिसे, प्रा. शशीकांत गिड्डे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या परिषदेचे सुञसंचालन डाॅ. राजश्री बाडगे व प्रा. सुधा सुरवसे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डाॅ. संपत देशमुख यांनी मानले.
 
फोटो-पंढरपूर सिंहगड मधील आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद मध्ये विजयी संशोधकांसोबत मान्यवर.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments