पंढरपूर- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

छाया-  पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान गणपतराव वानखेडे यांचा सन्मान करताना मान्यवर.
 कार्यक्रमात विचार व्यक्त करताना प्रमुख पाहुणे श्री. शिनखेडे
सर्व पत्रकार बांधवांसह मान्यवर.
Pandharpur Live : 
पत्रकारांनी समाजमन घडविण्याचे कार्य करावे - सुनील शिनखेडे
पंढरपूर-“पत्रकारिता हे एक शस्त्र व शास्त्र असून त्याचा पत्रकारांनी नेमका वापर केला पाहिजे. बातमी लेखनांमध्ये सत्यशोधन ही महत्वाची भूमिका असली पाहिजे. समाजाची नाडी ओळखून पत्रकारांनी समाजमन घडविण्याचे कार्य करावे. वर्तमानपत्र हा विश्वासाचा मार्ग असल्याने याचे पावित्र्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आधुनिक काळात कितीही तंत्रज्ञानाने प्रगती केली तरी मुद्रीत वर्तमानपत्राला पर्याय नाही. पत्रकारांनी भाषा शुध्द व प्रभावी वापरावी.” असे प्रतिपादन सोलापूर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख व सहायक संचालक सुनील शिनखेडे यांनी केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘मराठी पत्रकार दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, उपप्राचार्य बाळासाहेब तोडकरी, उपप्राचार्य अशोक चंदनशीवे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

सुनील शिनखेडे पुढे म्हणाले की, “बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने देशात पहिले वर्तमानपत्र सुरु केले. त्यांनी वर्तमानपत्रांनी आरसाची भूमिका पार पाडून समाजाचे प्रतिबिंब स्पष्टपणे  दाखविले पाहिजे ही भूमिका मांडली होती. ती भूमिका पत्रकारांनी सार्थ करणे अपेक्षित आहे. वेगवेगळ्या स्थित्यंतरातून समाज वाटचाल करत असतो. अशा समाजापुढे सत्य बाबी आणून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. राष्ट्रनिर्माणात वर्तमानपत्राचा महत्वाचा वाटा असतो.” 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “सध्या समाजजीवनात खाजगीकरण, उदारिकरण व जागतिकिकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. समाजाला सावरण्यासाठी शिक्षकांना लीडरशीप, फिलॉसॉफर व गाईडची भूमिका पार पाडावी लागत आहे. पत्रकारांनी शिक्षकांसोबत काम केल्यास समाजाला पुढे घेवून जाता येईल. अनेक आव्हाने पेलता येतील. म्हणून समाजात पत्रकार आणि शिक्षक यांची भूमिका महत्वाची आहे. समाजात महापुरुषांची वाटणी जाती-जातीत होण्याचे प्रमाण वाढत असल्याने समाज दुभंगत आहे. दुभंगलेल्या समाजाला एकसंघ करण्याचे आव्हान शिक्षक व पत्रकरांसमोर आहे. ते आव्हान एकत्र आल्याशिवाय संपुष्टात येणार नाही.” या कार्यक्रमात सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिध्द व फोटो समितीचे प्रमुख डॉ. दत्ता डांगे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. सुमन केंद्रे यांनी करुन दिला. या कार्यक्रमात पंढरपूर शहर व परिसरातील साठ पेक्षा अधिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रघुनाथ पवार व कु. हेमा भोसले यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. घन:शाम भगत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.
............................................................................................................................................

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments