पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 'रायझिंग वीक' निमित्त शस्रांचे प्रदर्शन! प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




Pandharpur Live : 
2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान महाराष्ट्र पोलीस दलाकडून रायझिंग वीक साजरा केला जातो त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडून दिनांक 7 जानेवारी व 8 जानेवारी या दिवशी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस दलाकडे असणाऱ्या शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     या शस्त्र प्रदर्शनामध्ये पोलिसांकडील 303 रायफल कार्बाइन, 9 MM पिस्टल, SLR, AK47, इंसाइज रायफल, 12 बोर रायफल अशी शस्त्रे ठेवण्यात आली होती, तसेच पोलिसांसाठी दैनंदिन कामकाजात उपयोगी येणारे साहित्य त्यामध्ये लाठी, हातकडी, ढाल, हेल्मेट हे साहित्य दाखवण्यात आले.

        यावेळी उपस्थितांना ट्रॅफिक साईन बोर्ड व ट्रॅफिकचे रूल्स याविषयी माहिती देण्यात आली. 
     7 जानेवारी व 8 जानेवारी रोजी एकूण 20 ते 22 शाळांमधील जवळपास 2500 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इतर जनसामान्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

     या प्रदर्शनाबाबत पंढरपूरकरांनी समाधान व्यक्त करून पोलीस दलाचे आभार मानले. यामुळे पोलीस-जनता संबंध अजून दृढ होईल. अशी प्रतिक्रिया पंढरपूरकरांमधून व्यक्त होत आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments