पंढरपूर नगरपरिषद विविध विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध


Pandharpur Live : 
पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये बांधकाम समितीच्या सभापतीपदी विक्रम शिरसट, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी गुरूदास अभ्यंकर तर आरोग्य समितीच्या सभापतिपदी रेणूका घोडके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी रेहाना बोहरी तर उपसभापतिपदी ललिता डोके यांची निवड झाली आहे. पालिकेत परिचारक गटाचे मोठे बहुमत असल्यामुळे विरोधी गटाकडून उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आलेले नाहीत.

पंढरपूर नगरपालिकेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, महिला बालकल्याण या समितीच्या सभापतिपदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सत्ताधारी आ. प्रशांत परिचारक यांच्या आघाडीकडून विक्रम शिरसट, गुरूदास अभ्यंकर, रेणुका घोडके, रेहाना बोहरी यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. विरोधी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून संख्याबळ लक्षात घेता एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे विहीत वेळेनंतर निवडणूक निर्णयाधिकारी सचिन ढोले यांनी सर्व समितीच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

त्यानंतर ढोले यांच्या हस्ते सर्व सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली. यामध्ये दगडू धोत्रे, वामन बंदपट्टे, स्वाती धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, उपनगराध्यक्षा सौ. लतिका डोके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सभापतींच्या समर्थकांनीही सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments