महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग व सफाई कर्मचा-यांना विविध मागण्यांवर चर्चा करणेबाबी कोकण विभागातील महानगरपालिका व नगरपरिषद कर्मचा-यांचा कोकण विभागीय मेळावा पनवेल येथे म्युनिसीपल एप्लॉईज युनीयनचे अध्यक्ष अॅड.सुरेश ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार प्रशांत ठाकुर, शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहरशेट भोईर, पनवेल महानगरापालिकेच्या महापौर डॉ.कविता चौतमल, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, म्युनिसीपल एप्लॉईज युनीयनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव, महाराष्ट्र राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के.आंधळे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय मेळावा पार पडला.
या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व संवर्ग, नगरपालिका नगरपंचायत कर्मचा-यांना १ जानेवारी २०१६ पासुन ७ वा वेतन आयोग लागु केला आहे. मागील फरकाची रक्कम शासनाने नगरपरिषदांना त्वरीत अदा करावीत. ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये नव्याने केलेले आहे. या नगरपंचायती मधील कर्मचारी, सफाई कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी कामगार यांचे विना शर्त विना अट समावेशन करावे व त्यांचा ग्रामपंचायत मधील सेवा कालावधी पेन्शन पात्र सेवा कालावधी धरावी, शासनाने नगरपरिषदकर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा चे दरमहा १ तारखेला वेळेवर व्हावे म्हणून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम संचालक कार्यलयाकडे द्यावी व कर्मचा-यांचे वेतन १ तारखेला करावे तसेच सेवा निवृत्त कर्मचारी व संवर्गातील कर्मचा-यांच्या थकीत रक्कमा त्वरीत अदा कराव्यात.
रोजंदारी, कंत्राटी कामगार यांना कायम करावे व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करावी संचालकांनी वारंवार आदेश काढून ही आजही किमान वेतन कर्मचारी ना दिले जात नाही ते त्वरित द्यावे, अनुकंपाची भरती त्वरित करावी, २७ मार्च २००० पर्यंत चे काही रोजंदारी कर्मचा-यानां अध्याप कायम केलेंले नाही त्यांना त्वरित कायम करावे शक्यतो त्यांचे त्याच नगरपरिषद मध्ये समावेशन करावे नगरपरिषद कर्मचा-याना २४ वर्ष कालपद्ध पदोन्नती ज्या तारखे पासून 24 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या दिवसापासून लागु करावी व 7 वा वेतन लागू झाल्या नंतर 10, 20, 30 वर्षांची कालबद्ध पदोन्नती मिळावी कर व प्रशासकीय सेवा मधील कर्मचारी यांना 5000-8000 वेतन श्रेणी लागू करून 4200 ग्रेड पे लागू करावा, सफाई कामगार व इतर वर्ग 4 चा कर्मचारी यांना वर्ग 3 वर पदोन्नती द्यावी, संवर्ग कर्मचारी चे प्रश्न मार्गी लावावेत, सफाई कर्मचारी यांना मोफत घरे द्यावीत तसेच सफाई कर्मचारी वारसा हक्क लागु करताना अनुसुचित जाती व जमातीच्याच वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबतचा आदेश रद्द करावा तसेच इतर समाजातील जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासुन सफाई कामगार म्हणुन काम करीत आहेत त्यांनाही वारसा हक्काने नियुक्ती द्याव्यात. अलिबाग, लांजा, खोपोली, दापोली येथील रोजंदारी कर्मचारी कायम करावेत या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सदरच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि.२२ जानेवारी २०२० पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचा-यांचा पनवेल ते मंत्रालयावर लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच येत्या अधिवेशनामध्ये मोढ्या प्रमाणात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचाही निर्णय या मेळाव्यामध्ये घेण्यात आला. सदरचा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी व तो यशस्वी करण्यासाठी म्युनिसीपल एप्लॉईज युनीयनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव व पनवेल नगरपरिषदेमधील सर्व कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments