कै.वामनराव शिंदे साहेब यांचे कार्य दीपस्तंभासारखे-आ.अॅड शहाजीबापू पाटील
सांगोला(प्रतिनिधी)-कै.वामनराव शिंदे साहेब यांनी आदर्श कन्या प्रशालेची स्थापना केली. त्यामुळेच बहुजनांची मुले शिक्षित झाली. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे असल्याचे गौरवोद्गार सांगोल्याचे आमदार अॅड शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
शनिवार दि.१८ जानेवारी २०२० रोजी येथील कन्याप्रशालेचे ‘‘कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय’’ असे नामांतर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अॅड पाटील म्हणाले की, प्रशालेने अतिशय कठीण परिस्थितीतून प्रशालेचा विस्तार करुन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे तसेच येथील कर्मचारी वर्गांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. प्रशालेत दिल्या जाणार्या सोयी-सुविधा व गुणवत्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत सोयी-सुविधांसाठी आगामी काळात मदत करु असे सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, अॅड श्री.विजयसिंह चव्हाण, श्री.सुरेश पाटील(डाएट वेळापूर), यांनी कै.वामनराव शिंदे साहेब यांनी सामान्यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाची सुरवात संस्थापक कै.वामनराव शिंदे व सरस्वतीच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तर नंतर आ.अॅड शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नामांतराचे कोनशिला अनावरण करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, अॅड.मानसिंह जहागिरदार, निलकंठ शिंदे सर, सुभाषराव राजेभोसले, नगरसेवक सुरेशआप्पा माळी, गजानन बनकर, अनुराधा खडतरे,अॅड.शशिकिरण पाटणे, गिरीषीाऊ नष्टे, दादासाो खडतरे, बापूसाहेब माने-देशमुख, रामभाऊ शिंदे, विजयश्री खडतरे, कमल इंगवले, सुरेश खडतरे, प्रफुल्ल देशपांडे, संजीवनी पोळ, तेजस्विनी वरखडे, राजलक्ष्मी शिंदे, ऐश्वर्या देशपांडे, विलास पाटील, दत्तात्रय पाटील, मारुती मेटकरी, प्रकाश खडतरे, आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेत वर्षभरात संस्थांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थीनींना करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थीनींनी आपल्या मनोगतातून प्रशाला व शिक्षकांविषयी असणारी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांनी केली तर सुत्रसंचलन सुवर्णाताई इंगवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने करण्यात आली.
फोटो ः सांगोल्यातील कन्याप्रशालेचे ‘‘कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय’’ असे नामांतरण झाले. या कोनशिलेचे अनावरण करताना आ.अॅड शहाजीबापू पाटील, राणीताई माने, सुरेश माळी, निलकंठ शिंदे, सुवर्णप्रभा घोरपडे, गजानन बनकर, आदि मान्यवर.



0 Comments