पंढरपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर येथील श्री गणेश रूग्णसेवा मित्र मंडळ पंढरपूर संचलित निवासी मूक बधिर विद्यालय , पंढरपूर या कर्णबधिरांच्या विशेष शाळेत मार्च २०१९ मध्ये पंढरपूर शहर पोलीस निर्भया पथकाने चार शिक्षक कर्मचाऱ्यांवर पोक्सो कायद्यान्वये कारवाई केली होती. संस्थेतील 4 विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलेले हे शिक्षक मात्र पुन्हा कामावर रुजू झाले असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळेत अद्यापही संबंधित पीडीत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. असे असताना हे अपराधी शिक्षक पुन्हा याच शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले असतील तर सदर शिक्षकांकडून पीडीत विद्यार्थिनीवर दबाव आणुन जबाब बदलण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ही बाब गंभीर असुन याविरूद्ध समाजसेवक यशवंत डोंबाळी यांनी आवाज उठवला आहे.
हा गुन्हा घडल्याचे समजले तेंव्हा संस्थेने त्या चौघांना नोकरीतुन निलंबितही केले होते . परंतु सदर शाळेत अल्पवयीन तक्रारदार मुली शिक्षण घेत आहेत , हे माहित असूनही जिल्हा प्रशासन व शालेय प्रशासनाने संगनमताने त्या चार शिक्षक कर्मचाऱ्यांना परत मागच्या महिन्यापासून त्याच पदावर कामावर हजर करून घेतले आहे , यामुळे तक्रारदार मुली व साक्षीदारांवर दबाब येण्याची किंवा आणण्याची शक्यता असल्याने पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत डोंबाळी यांनी सामाजिक न्याय मंत्री महोदयांकडे सखोल चौकशी व कारवाईची मागणी केली आहे .
तक्रारी अर्जाच्या प्रती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा , सामाजिक न्याय विभागाचे सचिव , अपंग कल्याण आयुक्त , जिल्हाधिकारी सोलापूर , पोलीस अधिक्षक सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , सोलापूर यांनाही पाठविल्या आहेत .

0 Comments