पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकळी रोडवरील घर फोडले... सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी रोडवरील प्रतिभाताई परिचारक नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घराच्या कपाटातील सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कमेसह  एकुण 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार येथील आदिनाथ दगडू बनकर हे आपल्या बार्डी येथील शेतात काम असल्याने घर बंद करून गावाकडे गेले होते. दरम्यान दि. 20 जानेवारी 2020 रोजी आपल्या घरात सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान चोरी झाल्याचे त्यांना समजले.

बनकर हे घरी आले तेंव्हा घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला होता व घरातील कपाट उचकटलेले व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. यासंदर्भात बनकर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे 5 तोळ्याचे मंगळसुत्र,  अडीच तोळ्याच्या 2 बांगड्या, सोन्याची 2 ग्रॅमची नथ, चांदीचा तांब्या, पेला, ताट, कृष्णदेव, निरांजन, पैंजण व रोख रक्कम असा एकुण 3 लाख 23 हजारांचा माल चोरला आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील कार्यवाही सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments