साईबाबा जन्मस्थान वादाला पूर्णविराम... तिर्थक्षेत्र म्हणून होणार पाथरीचा विकास-मुख्यमंत्री

मुंबईः साई बाबांच्या जन्मस्थळावरुन उद्भवलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी (दि.20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीतल्या शिष्टमंडळांची बैठक झाली. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिली आहे. त्यामुळे आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याचवेळी बंद मागे घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला होता. दरम्यान, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.

Post a Comment

0 Comments