Pandharpur Live :
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरणे शेवटच्या दीड मिनिटात पट काढण्याचा प्रयत्न करून मिळवलेल्या १ गुणच्या जोरावर शैलेश शेळकेचा २-१ गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले.
हर्षवर्धन सदगीर
- नाशिकचा मल्ल
- वडील शाळेत क्लार्क
- सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे आखाड्यात मग पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे
- ग्रिकोरोमणचा राष्ट्रीय विजेता
- मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभव
- आक्रमक खेळाडू म्हणून ओळख
- पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे ,तालुका अकोले येथील सुपुत्र असणारा मात्र नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा हर्षवर्धन सदगीर हा अहमदनगर मधील एका शाळेच्या प्रयोग शाळेतील लॅब शिक्षकाचा मुलगा आहे. हर्षवर्धन चे वडील शिक्षक असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते.
हर्षवर्धन हा एमएच्या द्वितीय वर्षात शिकत असून, राज्यशास्त्र विषयी घेतला आहे. पाच वर्षापासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्यांनी पदक मिळवलेले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आज सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला जिगरी यार व आजच्या अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेत स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, माजी खासदार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, अमनोरा संस्थापक संचालक अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, संग्राम मोहोळ, नानासाहेब बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे सुनील तरटे, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे , परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, ओलिम्पियन पहिलवान मारुती आडकर, बांदा पाटील, संभाजी वरुटे आदि उपस्थित होते. यावेळी आगामी होणाऱ्या केसरी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यामध्ये महेश मांजरेकर, निर्माते सुजय डहाके आणि कलाकार उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले, यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्यांचा सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आलेले असून हीच खरी कुस्तीची किमया आहे.
लांडगे म्हणाले, आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे. आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________





0 Comments