अभिमानास्पद दिनविशेष:- महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांसमोर पोलिसांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक..जाणून घ्या यामागचा इतिहास

Pandharpur Live : 
महाराष्ट्र हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत 'महाराष्ट्र पोलीस' (Maharashtra Police). आज, 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन संपन्न झाला. मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांचे विशेष संचलनासह विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी पोलिसांचे शानदार संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अति.मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या दिनाचे औचित्य साधून, मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आपली उपस्तिथी दर्शवली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाशी संवादही साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचे विशेष संचलन देखील यावेळी पार पडले, यामध्ये जवळजवळ 250 पोलिसांचा सहभाग होता.

महाराष्ट्र पोलीस दल इतिहास -

महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास पाहिला तर पहिली नोंद आढळते ती 1661 साली. त्या वेळी पोर्तुगीजांनी पोलिस चौकीची स्थापना करून भागात कायदेशीर अंमलबजावणीची मूलभूत संरचना तयार केली. त्यानंतर 1672 साली सात बेटांचे रक्षण करण्यासाठी भंडारी ब्रिगेड नावाची फौज नेमली गेली. हीच फौज अधिक शिस्तबद्ध होत महाराष्ट्र पोलीस दलाचा उगम झाला.

1936 मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे 1947 मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम,1956 नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर 2 जानेवारी 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली.

तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला, तोच पोलिस दलाचा स्थापना दिन म्हणून ओळखला जातो. सध्याचे महासंचालक संजीव दयाळ यांच्या पुढाकारातून दोन वर्षांपासून हा 'स्थापना दिन' साजरा होत आहे. यामुळेच आज राज्यात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.

आजच्या या वर्धापन दिनानिमित्त हर्ष फायरचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. तसेच यावेळी पोलिसांच्या 200 जणांचा सहभाग असलेल्या बँड पथकाचे सादरीकरण होणार आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे होते, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक आहे. या दलात 10 पोलीस आयुक्तालये व 36 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 1,80,000 असून, मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे. 

सर्व पोलीस बंधु भगिणींनी पंढरपूर लाईव्ह कडून आजच्या विशेष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments