प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या चित्ररथाला नकार... केंद्र सरकार आकसबुध्दीनं वागतंय... सुप्रियाताई संतापल्या!


Pandharpur Live : 
प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने नाकारला आहे. महाराष्ट्राने यंदा पथसंचनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या संकल्पनेवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तो नाकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारसह 32 राज्यांनी चित्ररथाच्या सादरीकरणासाठी केंद्राकडे अर्ज केले होते. परंतु गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने फक्त 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या, तर 6 मंत्रालयांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. संमती नाकारलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगालचा समावेश आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचा चित्ररथ जाणूनबुजून केंद्र सरकारने नाकारल्याची टीका बंगालमधील नेत्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या कन्याश्री योजनेवर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव बंगालने मांडला होता. परंतु सांस्कृतिक मंत्रालयाकडून नाकारला गेला आहे. बंगाल सरकारने केंद्राच्या नागरिकत्व कायद्याला जोरदार विरोध केल्यामुळेच ही संधी नाकारल्याचा आरोप तृणमूलचे खासदार सौगर रॉय यांनी केला आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments