राज्यमंत्री बच्चू कडूंचा पहिल्याच दिवशी दणका! 2 कामचुकार अधिकाऱ्यांना केले निलंबित


Pandharpur Live : अमरावती- 
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. काल दर्यापूर येथील उपविभागीय कार्यालयाला भेट देऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली. पुरवठा विभागातील दोन अधिकाऱ्यांवर याच दरम्यान एका वृद्ध शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत निलंबनाच्या कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची प्रमोद काळे आणि सपना भोवते, अशी नावे आहेत.

राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न केल्यास माझा सामना करावा लागेल, अशी सक्त ताकीद दिली आहे. 

बच्चू कडू यांनी अकोट येथे जात असताना दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना तहसीलदार योगेश देशमुख आणि उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत पाचारण केले. यावेळी अधिकाऱ्यांनी सेवा हमी योजनेची योग्य अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिणामी त्यांनी अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली.

याआधी बच्चू कडू हे आमदार असताना प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्यात कायम वाद झाले आहेत. मंत्रालयात देखील कक्ष अधिकार्‍याला कानाखाली वाजवल्याप्रकरणी ते अडचणीत देखील आले होते. तर तुरीचा थकीत चुकारा न दिल्यामुळे बच्चू कडू यांनी अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍याला तीन तास कार्यालयात कोंडले होते. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकार्‍याची सुटका केली होती.



_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments