जाणून घ्या ठाकरे सरकारच्या 10 रुपयांच्या 'शिवथाळी' बाबत... हे असतील मेनू


Pandharpur Live : 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारच्या 10 रुपयांच्या थाळीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.  शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात 10 रू जेवण देण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेनं आपलं वचन पाळलं आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत गरीब व गरजू लोकांना 10 रुपयात जेवण उपलब्ध करून घ्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता.प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे.

अशी असेल थाळी
शासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी,
- ३० ग्रॅमच्या दोन चपात्या
- १०० ग्रॅमची एक वाटी भाजी
- १५० ग्रॅमचा एक मूद भात
- १०० ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी १० रुपयात देण्यात येईल.

ही भोजनालये दुपारी १२ ते २ या कालावधीत कार्यरत देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये इतकी राहणार आहे.

शिवभोजन पहिल्या टप्पयात पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात सुरू होणार आहे. 100 ग्रॅम भाजीची वाटी, 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम वरण आणि 150 ग्रॅम भात अशा प्रकारची शिवथाळी असणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी1500 नागरिक या योजनेचा लाभ दुपारी 11 ते 2 या वेळात घेऊ शकणार आहेत.

या भोजनालयात एकावेळी किमान 25 लोक बसू शकतील एवढी आसनव्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. दरम्यान, एखाद्याला या शिवथाळी उपक्रमात सहभागी व्हायचं असंल तर त्याकडे पर्याप्त जागा असायला हवी. सध्या सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments