पंढरपूर - मकरसंक्रांतीनिमित्त चौफाळा रिक्षा स्टॉफ पंढरपूर यांच्यावतीने तिळगुळ वाटप व पर्यावरण संवर्धनासाठी पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे एपीआय गणेश निंबाळकर, वन विभाग अधिकारी पत्की मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक व्यक्तीस एक रोप व भाविकांना तुळशीचे रोप भेट देवून मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूरात प्रथमच रिक्षा चालकांच्या वतीने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बाबा पुजारी, गजानन महाजन, शिवराम लॉजचे प्रमोद गंगाखेडकर, विजया लॅबचे कामत, चौफाळा रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष प्रणित चव्हाण, प्रमोद डिग्रजे,गणेश राऊत, पिंटू चौधरी, रवि केसकर, सतीश नवत्रे, नाना वाडेकर, कृष्णा पाटसकर, सचिन पाटसकर, अशोक जाधव, देविदास गोंजारी, अमर पाटसकर, बाबा भागानगरे, बाळू वाघमारे, उमेश आंबेकर, सनी थिटे, शेखर बंडगर, रमेश सासवडकर, शिवाजी भोसले यांच्यासह सर्व रिक्षा चालक उपस्थित होते.


0 Comments