पंढरीतील नवीपेठेत आढळला 45 वर्षीय व्यक्ती चा मृतदेह


पंढरपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर येथील नवीपेठेत व्यापारी कमेटी कार्यालयानजीक एका अंदाजे 45 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आज दुपारी आढळून आला.

किशोर गोविंदा महाजन (रा. जळगाव) असे सदर मयत व्यक्तीचे नाव असुन अतिमद्यपान केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलवल्याचे समजते. अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments