पंढरीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल न.प. आरोग्य विभागाकडून अभिनंदन



केंद्र सरकारची पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पंढरपूर तालुक्यात चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल पंढरपूर नगरपरिषद आरोग्य समिती च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

       पंढरपूरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम चांगल्या नियोजनाने पार पडली. रविवार १९ जानेवारी रोजी पंढरपूर शहरात ७९६८ बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. असे बालरोग तज्ञ डॉ. सागर गवळी यांनी सांगितले. या दिवशी विविध  केंद्राला भेट दिली असता असे निदर्शनास आले , तेथील शासन कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, नर्सिंग स्टाफ व मदतनीस यांनी चांगल्या प्रकारे काम केले.‌ त्या भागात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लहान मुलांकडे त्यांचे लक्ष असायचे व त्वरित पोलिओ डोस देण्यात यायचा. 
            तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ढवळे, डॉ. सागर गवळी, पंढरपूर शहर वैद्यकीय अधिकारी डॉ. बजरंग धोत्रे व डॉ. सालविठ्ठल मॅडम यांनी खुप चांगल्या प्रकारे पल्स पोलिओ मोहीम राबवली, समन्वय साधून चांगले नियोजन केले या बद्दल पंढरपूर नगरपरिषद आरोग्य समिती मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले व बुधवारी २२ जानेवारी २०२० या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात आरोग्य समितीच्या मिटींग मध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 
          सदर मोहीम पार पाडताना विविध सामाजिक संस्थेने लहान मुलांना पोलिओ डोस घेण्यासाठी,  त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी काही सेंटर वर डोस घेणाऱ्या बालकांना छोटीशी खेळणी भेट देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पंढरपूर मार्फत बरेच सेंटरवर खेळणी देण्यात आली , लायन्स क्लब पंढरपूर मार्फत सुश्रुत हॉस्पिटल येथे डोस घेणारे बालकांना खेळणी देण्यात आली तसे नवीन बस स्थानक येथे नुतन आरोग्य समीती सभापती विवेक परदेशी यांच्या वतीने बालकांना खेळणी भेट देण्यात आली.
          ज्या बालकांनी विविध कारणांमुळे डोस आद्याप घेतला नाही त्यांच्यासाठी ४० टिम सोमवार पासून ५ दिवस पंढरपूरातील विविध भागात फिरुन लहान मुलांना पोलीओचा डोस देण्यात येत आहे. पंढरपूर शहरात सोमवारी ९०४ तर मंगळवारी ८१७ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री ढवळे यांनी दिली व त्यांनी आवाहन केले की या लसीकरण मोहीमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन सर्व ० ते ५ वयोगटाती सर्व बालकांना डोस देण्यात आले की नाही याची खात्री करावी, जेणेकरून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,  कोणी बालक वंचित राहत असेल तर त्वरित उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा असे सांगितले.
            या प्रसंगी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, आदित्य फत्तेपुरकर, महादेव भालेराव, अनुसयाताई शिरसट , आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments