पंढरीत पत्रकार दिन उत्साहात साजरा... पंढरीतील सर्व पत्रकारांचा झाला सत्कार


Pandharpur Live : 
सर्वसमावेशकता हा पत्रकारीतेचा गाभा आजही कायम-जोशी
पंढरपूर- बदलत्या काळानुसार पत्रकारीता बदलली असली तरी सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्‍न मांडणे हा त्याचा गाभा आज देखील कायम असल्याचे मत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पत्रकार दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

येथील नगरपरिषदेच्या पत्रकार भवन येथे शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे व विशेष निमंत्रीत म्हणून माहिती कार्यालयाचे अधिकारी अविनाश गरगडे,  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, विविध पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असलेले मंदार लोहोकरे, सुर्यकांत बनकर, रामभाऊ सरवदे, श्रीकांत कसबे, विकास पवार व भगवान वानखेडे आदी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्री करणार्‍या जयंत ताठे व योगेश आणेराव यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना विठ्ठल जोशी यांनी, आज माध्यमांची संख्या व प्रकार वाढले असले तरी जनतेचा पत्रकारांवर विश्‍वास कायम आहे. मात्र यासाठी पत्रकारांनी देखील विश्‍वासहर्ता जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्या टिव्ही की वृतपत्र मोठे असा नेहमी वाद सुरू असतो. परंतु टिव्ही चॅनलची बातमी पाहणे म्हणजे समोसा खाणे आहे तर वृत्तपत्राची बातमी वाचणे पुरणपोळीचे जेवणे करण्यासारखे आहे असे उदाहरण त्यांनी दिले. कारण आज देखील लोक वृत्तपत्रात छापून आलेल्या बाततीवर किंवा माहितीवर अधिक विश्‍वास ठेवतात असे स्पष्ठ केले. यावेळी जोशी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातील विविध संपादकांचे अनुभव कथन करून मी जर अधिकारी झालो नसतो तर निश्‍चितच तुमच्या सारखाच पत्रकार म्हणून काम केले असते असेही सांगितले.

अध्यक्षीय भाषणात सिध्दार्थ ढवळे यांनी, सुरूवातीला पत्रकारीता करण्यासाठी मोठे कष्ठ घ्यावे लागत होते. त्या मानाने आता पत्रकारीता सोपी झाली असल्याचा अनुभव सांगितला.  
पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक, पत्रकार संरक्षण समिती चे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान गणपतराव वानखेडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तो क्षण.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments