पब्जी गेमच्या नादाने विवाहित महिलेवर अतिप्रसंग... मुंबई-वलसाडमध्ये बलात्कार

Pandharpur Live : 
पब्जीच्या साहाय्याने गुजरातच्या वलसाडमध्ये राहणाऱ्या एका युवकाने भोपाळच्या एका विवाहित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून मुंबई आणि वलसाड येथे तिच्यावर बलात्कार केला. माहितीनुसार पीडिता (वय 23 वर्ष) भोपाळमध्ये राहते. तिला पब्जी खेळण्याची खूप आवड होती. पब्जीच्या माध्यमातून वलसाडमध्ये राहणाऱ्या आरोपीशी तिची ओळख झाली. काही कालवधीनंतर या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पीडितेला नोकरी लावण्याचे आमिष देत त्याने मुंबईत बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वलसाड येथे नेऊन आपल्या मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, पीडितेच्या पतीने आणि कुटुंबीयांनी भोपाळ पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. याची माहिती आरोपींना मिळताच पोलिसांच्या भितीने त्यांनी पीडितेला आपल्या ताब्यातून सोडले. पीडिता घरी परतल्यानंतर घडलेली सारी कहाणी तिने आपल्या पती व कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर त्यांनी भोपाळच्या गौतम नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.


भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबईच्या विनोबा भावे नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या हाती सोपावला आहे. या आरोपींविरोधात भादंवि कलम 376, 383, 323, 504 आणि 534 अंतर्गत 26 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश पवार यांनी दिली. सध्या या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

तरुणांमध्ये मोबाईलमधील 'पब्जी' खेळाला अधिक पसंती आहे. या वर्गाकडूनच पब्जीची अधिक मागणी असते. पब्जीमुळे गुन्हेही घडत असल्या कारणाने तो वादग्रस्तही ठरला आहे. पब्जीसाठी घरातून पळून जाणे, मारहाण आणि अपहरण यांसारख्या घटनेत वाढ होत असतानाच आता बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचाही त्यात समावेश झाला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments