'ती' बातमी धादांत खोटी... खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासार्हता कमी होईल- अजित पवार


Pandharpur Live : 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे वृत्त माध्यमातून आले होते. यावर अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.  या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. त्यामुळे मी ही बातमी देणाऱ्या संबंधित वृत्तपत्राच्या प्रमुखांशी बोललो. संपादकांशी बोललो. अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी आहे, असे अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासार्हता कमी होईल. तसेच ज्या पत्रकाराने बातमी दिली अद्यापत्या पत्रकारांनी फोन उचलला नाही. त्यांनाही विचारणार आहे. त्यांच्याकडे जर दुसऱ्या बातम्या देण्यासाठी नसतील तर ठिक आहे, असे पवार म्हणाले.

दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या 4 तासांच्या या काँग्रेसने कृषी आणि ग्रामविकास किंवा तत्सम महत्त्वाचे खाते आम्हाला बदलून द्यावे, असा आग्रह धरला. तेव्हा अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख बैठकीत केला होता. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेखावर अशोक चव्हाण म्हणाले, आम्हीही मंत्रिमंडळात आहोत. ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मग त्यांचा इथे संबंध काय येतो? मीही माजी मुख्यमंत्री आहे.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या या भाष्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे संयमी नेते आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत, चर्चेत ते होते, असे म्हणत तुमच्यात नक्की नेता कोण ते तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा, असे अजित पवार पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर चव्हाण बैठकीतूनही बाहेर निघून गेले, असे सांगितले जात होते.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments