थिएटरच्या आवारातच दिग्दर्शक व कलाकारास बेदम मारहाण... प्रसंगावधानाने अभिनेत्री बचावली

अभिनेत्री थोडक्यात बचावली
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मराठी चित्रपट 'बायको देता का बायको!' च्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला अज्ञात हल्लेखोरांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत, तर अभिनेत्री श्वेता कुलकर्णी थोडक्यात बचावल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात चित्रपटातील कलाकार आले असता आज(शनिवार) सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली.  अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्याच बचावली.

बीड येथील आशा सिनेफ्लेक्स चित्रपट गृहात 'बायको देता का बायको!' सिनेमाचा शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आले होते.


याचदरम्यान, सिनेमागृहाच्या आवारात अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चित्रपट अभिनेते सुरेश ठाणगे व निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने बचावासाठी तेथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. हल्लेखोरांनी आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात फर्निचरची तोडफोडही केली, मारहाण करणारे कोण होते याचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments