पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका 32 वर्षीय विवाहितेवर त्याच गावातीलच तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना आज उघडकीस आली. पोलिसांनी संशयित आरोपी राहुल सोनवणे, विशाल गिरे, सोमनाथ गायकवाड (सर्व रा. संवत्सर) यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली.
पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की ही घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माझ्या शेताजवळ घडली. आरोपी विशाल गिरे याने 16 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता माझ्या मोबाईलवर फोन करून शरीरसंबंधाची मागणी केली. त्याच दिवशी रात्री नऊ वाजता राहुल सोनवणे याने तसाच फोन केला. त्याचा फोन मी बंद करून टाकला.
18 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतात गवत कापायला गेली असता तिन्ही आरोपी तेथे आले. मला पकडून शेजारच्या मक्याच्या शेतात नेले व राहुल सोनवणे व विशाल गिरे यांनी बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास पती व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भरत नागरे तपास करीत आहेत.
0 Comments