लोटस इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवरायांची ३९० जयंती उत्साहात साजरी

Pandharpur Live-
पंढरपूर– कासेगाव (ता. पंढरपूर) श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
      पूर्वा अवताडेसंचीता जमदाडेप्रतिक्षा शिंदेसमीक्षा भोसले, हर्षल साखरेप्रणव शेंडगे, तुषार कदमवेदांत मोरे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर भाषणे सादर केली तर श्रेयश घाडगे याने उत्तम पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कांही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा परिधान केली होती. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, ‘छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रियांना उच्च दर्जाचे स्थान होते. स्त्रियांवर अन्याय होत असेल तर दोषी व्यक्तीस त्वरित कठोर शासन केले जात असे परंतु आज शिवरायांचा काळ राहिला नसून अन्याय अत्याचार वाढला आहे, स्त्रिया सुरक्षित राहिल्या नाहीत. जर महाराजांचे विचार सर्वांमध्ये रुजवायचे असतील तर सर्वांनी त्यांची विचारधारा समजून घेऊन आमलात आणणे गरजेचे आहे. तरच स्त्री जातीचा सम्मान होऊ शकेल. स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी शिव-विचारांची गरज आहे. शिवजयंती निमित्त केवळ त्यांचे विचार प्रकट करून चालणार नाही तर ते दैनंदिन जीवनात अमलात आणले पाहिजेत.’ याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. बी. पी.रोंगेअध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच. एम.बागल, खजिनदार  दादासाहेब रोंगे यांनी विद्यार्थ्यांना  शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक संपत लवटे, ज्ञानेश्वर वायदंडे, सचिन निकम, मयूर वागज, सागर शिंदेराहुल हगरेआदीक्ष गायकवाड, शिक्षिका सविता झांबरे, सुनिता आसबे, समीना काझी, राखी बुंजकरसीमा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोपाळ माळी यांनी केले तर आभार विद्यार्थिनी सई शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments