Pandharpur Live-
पंढरपूर- स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्यावतीने राज्यातील डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘आर. सी. सी. स्ट्रक्चरच्या रिपेअर व मेंटेनन्ससाठी नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्टिंग (एन.डी.टी.) उपकरणांचा उपयोग’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी ‘स्ट्रक्चरल ऑडीट व नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्टिंग’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करत असताना बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट, नॉन डिस्ट्रक्टीव्ह पद्धतीने करण्याबद्धलची माहिती दिली. यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाबद्धल माहिती देवून ते कोठे व कशी वापरावी याबद्धल माहिती दिली. स्वेरीचे सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोंगे यांनी विद्यार्थ्यांना ध्येय वेडे होवून कार्य केल्यास इच्छित यश मिळते असे सांगून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात आलेले अनुभव सांगितले. या कार्यशाळेत प्रा. अविनाश कोकरे, प्रा. मंगेश सुरवसे. प्रा. सोनाली पाटील, चैताली अभंगराव, सुजाता इंगळे, निशिगंधा महामुनी, रविकिरण जाधव यांनी डिझीटल रीबाऊंड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी, हाफसेल पोटॅन्शियल टेस्ट, कव्हर मीटर (रीबार लोकेटर), काँक्रीट कोअर कटर शेक टेबल, टोटल स्टेशन आदी मशिन्सची तांत्रिक प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. यावेळी एस. इ. आय. टी. पानीवचे तन्मय पाटील व्ही.व्ही.पी. सोलापूरचे गणेश करपे आणि शिवाजी पॉलिटेक्निक, सांगोलाचे प्रविण रोंगे या विद्यार्थ्यांनी ‘स्वेरीने कार्यशाळेचे केलेले नियोजन उत्तम केले होते’ असे मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेत एस. इ.एस. पॉलिटेक्निक सोलापूर, फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, सांगोला, बी. एम. आय. टी., सोलापूर. न्यू सातारा महाविद्यालाय, पंढरपूर. एस.बी.पाटील पॉलीटेक्निक, इंदापूर. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), पंढरपूर, सिंहगड कॅम्पस, वडगाव यांच्यासह इतर महाविद्यालयातील जवळपास २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ व इतर प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.पी.डी. तरळगट्टी यांनी केले तर डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी आभार मानले.
0 Comments