‘शब्द-शिल्प वाचनालय’ व ‘पालवी’ पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘‘मराठी भाषा गौव दिन’



Pandharpur Live-
शब्द-शिल्प वाचनालय’ व पालवी’ पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज यांच्या  जन्मदिनी 'मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माढा येथील श्री. फु लचंद नागटिळक तर अध्यक्ष सौ. पुष्पावती भिंगे या लाभल्या होत्या. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 उपस्थित बालकांनी ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर आपली मनोगते सादर केली.

यानंतर श्री. फुलचंद नागटिळक यांनी वि. वा. शिरवाडकर यांचे सुप्रसिद्ध नटसम्राट नाटकातील प्रवेश सादर के ला व मराठी भाषेची महती थोडक्यात विशद के ली.  सौ. भिंगे यांनी अध्यक्षीय ‘‘भाषणात मराठी भाषा आपण जपली पाहिजे. मराठीत लिहिणे, बोलणे, वाचले पाहिजे हे प्रकर्षान ेनमूद के ले. कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन कु.माया नरुटे यांनी के ले तर प्रस्तावना सौ. ऋतुजा शहा व आभार प्रदर्शन श्री. राहुल झेंडे यांनी केले. कार्यक्रमास सौ.मंगल शहा, सौ.डिंपल घाडगे, सौ. कार्तिकी शहा, सौ. पठाण, श्री.देवकते हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. राजश्री कमले, श्री. रविकिरण गुंड,कु. काजल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments