सिंहगड मध्ये रविकिरण लोखंडे यांचा सत्कार करताना प्रा. सुधा सुरवसे सोबत इतर
Pandharpur Live-
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या रविकिरण लोखंडे यांनी तलाठी परीक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ करांडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करत असलेले पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यासासाठी मार्गदर्शन केले जाते. या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी यशस्वी होत आहेत. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभियांत्रिकी चे शिक्षण पुर्ण केल्यानंतर रविकिरण लोखंडे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. या दरम्यान त्यांनी एस. एस. सी. टायर-२ २०१८ मध्ये स्टाप सिलेक्शन झाले होते आणि २०१९ मध्ये तलाठी पदाच्या परिक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागा रविकिरण लोखंडे यांचा प्रा. सुधा सुरवसे, डाॅ. अल्ताफ मुलाणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना रविकिरण लोखंडे म्हणाले, आयुष्यात एकदा यश मिळवायचे ठरविले की पुन्हा माघार नाही घ्यायचे. स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असताना स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला यश निश्चित मिळेल यात शंका नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तुम्ही दुस-या-तिस-या वर्षी पासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला तर तुम्ही नक्की यश प्राप्त करू शकता असे मत रविकिरण लोखंडे यांनी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. अविनाश हराळे, प्रा. अमोल जगदाळे, स्मिता नवले, अमित करांडे आदी अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments