Pandharpur Live-
शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही व्यक्ती यशाचे शिखर गाठू शकत नाही आई वडिलांनंतर शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यांच्याकडून केवळ पाठ्यपुस्तके ज्ञान अपेक्षित नसून एक आदर्श नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने अलीकडे सर्व शिक्षकांवर बी.एल.ओ.सह अनेक शाळाबाह्य कामाची देण्यात आलेली जबाबदारी ही चिंताजनक असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पडत आहे असे मत आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
पंढरपूर पंचायत समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती प्रशांत देशमुख, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षण विस्ताराधिकारी बिभीषण रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख, सुभाष माने, शोभा वाघमोडे, सविता गोसावी, बाळासाहेब देशमुख, राहुल पुरवत, अरुण घोलप, पल्लवी यलमार, राजश्री भोसले, दादा मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श केंद्रप्रमुख म्हणून भानुदास शिंदे आणि मंगल धायगुडे यांना पुरस्कार देण्यात आला. 25 प्राथमिक शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय आहे जिल्हा परिषद सोलापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानेश्वर दुधाने ज्ञानेश्वर मोरे राजेंद्र डुबल आणि सोमनाथ जाधव पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन मारूती क्षीरसागर व दादा खांडेकर यांनी करुन आभार डाँ बिभिषण रणदिवे यांनी मानले.यावेळी स्वर पंढरी पंढरपूर यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले न्यानेश्वर दुधाणे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

0 Comments