आता शाळांनाही करा पाच दिवसांचा आठवडा- सुप्रिया सुळे

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
राज्यातील शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे शाळांनाही पाच दिवसाचा आठवडा कामकाजाचा निर्णय लागू करावा. पुणे जिल्हा परिषदेने याबाबत प्रस्ताव तयार करून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारार्थ पाठवावा, अशा सुचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या आहेत.

जिल्हा परिषदेत बारामती लोकसभा मतदार संघासाठी आरोग्य विभागाची आढावा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, शिक्षण समिती सभापती, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पाच दिवसाचा आठवडा करण्यात आल्याबाबत चर्चा सुरू होती. यावेळी प्राथमिक शाळांसाठी देखील हा निर्णय लागू करण्याबाबत चर्चा झाली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच शाळांना पाच दिवसाचा आठवडा लागू करता येईल, का याचा विचार करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा असेल तर शिक्षकांनाही लागू करता येईल. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ व कष्ट वाचतील. तसेच वाहतुकीसाठी लागणारे इंधनाचीही बचत होईल, असे मत सुळे यांनी मांडले. पाच दिवसांचा आठवडा केल्यास अभ्यासक्रम बसणार नाही, व तासिका पुर्ण होणार नाहीत, शाळांना उन्हाळा आणि दिवाळी या काळात सुमारे अडीच महिना सुट्ट्या असतात. त्यामुळे शाळांना हा नियम लागू नाही, असे सांगण्यात आले.

खासदार सुळे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएससी) शाळांमध्ये पाच दिवसाचा आठवडा आहे. त्यांच्या एवढा अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांना नाही. मग अभ्यासक्रम का पुर्ण होणार नाही, शिवाय अनेक शाळांना शनिवारी सकाळची अर्धा दिवसच शाळा असते, अशी भुमिका मांडली. त्यामुळे शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार करावा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सादर करावा, अशा सुचना खासदार सुळे यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

20 Comments

  1. पाच दिवसांचा आठवडा केल्यावर अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो,कारण शनिवारी अर्धा दिवस होणाऱ्या तासिका सोमवार ते शुक्रवार दररोज एक तास प्रमाणे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण होईलच.👍

    ReplyDelete
  2. विदर्भात शाळेची वेळ ११:०० ते ५:०० अशी आहे.ही वेळ सर्व राज्यासाठी १०:०० ते ५:०० करुन ५ दिवसाचा आठवडा करायला काही हरकत नसावी.
    -श्री.संजयकुमार र सरदार, जिल्हाध्यक्ष,म.रा.बहुजन शिक्षक महासंघ, जालना.

    ReplyDelete
    Replies
    1. शनिवारी होणारी धावपळ खुपचं ञासदायक होते शासनाने सकारात्मक विचारला हरकत नाही

      Delete
  3. शहरातील शिक्षकांना हे ठीक आहे? जे शहरापासून दूर ग्रामीण भागात जाण्यासाठी 2 तास येण्यासाठी 2 तास त्यांच्याशी चर्चा केली आहे का? ग्रामीण भागातील महिला शिक्षिका कधी घरकाम करणार प्रवास कधी करणार?

    ReplyDelete
  4. संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांसाठी हायस्कूलसाठी ५ दिवसांचा आठवडा करावाच व सर्व जयंती पुण्यतिथीच्या सुट्ट्या बंद कराव्यात. असे ऐकले आहे की जपानमध्ये थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी दिवशी एक तास जादा काम करून त्यांना श्रद्धांजली देतात, कृतज्ञता व्यक्त करतात.सहज मनुष्य स्वभावानुसार सुट्टीदिवशी शाळेत जाऊन सर्वच्या सर्व जयंत्या साजऱ्या करणे काहीसे वेगळे वाटते, परंतु या दिवशी शाळा असल्यास जयंत्या पुण्यतिथी जास्त वेळ देऊन साजरा करता येतील व अध्यापन ही होईल.

    सध्या बहुसंख्य शाळा द्विशिक्षकी आहेत व एका शिक्षकाकडे २ वर्ग आहेत, त्याच्याकडे मुख्याध्यापकांचा चार्ज असेल तर पोर्शन सुंदररित्या पूर्ण करणे अवघड होते. पाच दिवसांचा आठवडा करावा व हा उपाय हे योजल्यास नक्की पोर्शन योग्य रीतीने पूर्ण करण्यास हातभार लागेल व आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असल्याने प्रवास ,कार्यक्रम करता येतील शिक्षक-विद्यार्थी पूर्णपणे फ्रेश होतील पुढच्या दिवशी शाळेत येताना .

    ReplyDelete
  5. शाळेची वेळ सकाळी 10/५ अशी ठेवावी जयंती च्या सुट्या रद्द करण्यात याव्यात मुलांना खेळण्यासाठी वावमिळेल आरोग्य चांगले राहते

    ReplyDelete
  6. शाळा सोडून इतरांना पाच दिवसाचा आठवडा मंजूर केला मात्र संर्वांची मुले शाळेत जाणार त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या भावनांचा व व्यस्थतेचा विचार झालेला दिसत नाही . म्हणूनच शाळा 10 ते 4:30 अशा ठेवाव्या , व पाच दिवसाचा आठवडा करावा.

    ReplyDelete
  7. सर्व शाळांना व कॉलेज प्रथमतः पाच दि्सादिव आठवडा करावा कारण बरेच विद्यार्थी एसटीने प्रवास करतात त्याचा वेळ व नाहक त्रास वाचेल तसेच घरी अभ्यास करता येईल

    ReplyDelete
  8. शाळांना5 दिवसाचा आठवडा केला तर उर्वरीत 2 दिवस शिक्षकांना इतर कामे करून 5 दिवस चांगले अध्यापन होईल शिक्षक दांड्या मारण्याचा प्रश्न राहणार नाही

    ReplyDelete
  9. अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात पाच दिवसाचाच आठवडा आहे,आपणही करायलाच पाहिजे,चांगल्या गोष्टींचं अनुकरण!

    ReplyDelete
  10. दोन शिफ्ट मधील शाळांना इतर दिवशी वेळ वाढविणे शक्य होणार नाही असे वाटते

    ReplyDelete
  11. पाच दिवसांचा आठवडा करायला हरकत नाही कारण शाळेची वेळ ९:००/५:०० अशी वेळ वाढवून अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात

    ReplyDelete
  12. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना वेळ देता येईल ह्या मानसिक गरजेचा विचार करून पाच दिवसाचा आठवडा करण्यास हरकत नसावी.शिक्षक चिंतामुक्त असेल तरच तो प्रभावी अध्यापन करू शकतो.

    ReplyDelete
  13. दुसरा व चौथा शनिवार पूर्ण सुट्टी दिली तर चालेल . कारण हाफडे दिवशी सकाळी खूप धावपळ करावी लागते.

    ReplyDelete
  14. 5 day week is very essential becoz children now hv becum very restless nd indisciplined.They have no time to rest or play ,only are given pressure of studies.STursay nd Sunday shud be given holiday for better development of children.

    ReplyDelete
  15. सध्या जी पद्धत आहे तीच योग्य आहे.

    ReplyDelete
  16. खर तर शिक्षक मनापासून काम करतातच (अपवाद वगळता)
    आमचा जिव्हाळाचा प्रश्न आहे तो जुनी पेन्शन यावर सर्व मंत्री
    महोदयांनी विचार करावा हीच विनंती.
    बर्याच वेळा कर्मचार्यावर १० वर्षानंतर दुदैवी प्रसंग येतो अशावेळी संपूर्ण कुटुंब अस्थिर होते

    ReplyDelete