Pandharpur Live-
सांगोला- विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. संभाजीराव शिंदे हे होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व्यक्ती होते. त्यांच्या इतिहासापासून प्रेरणा घेत असताना अनुकरण केल्यास आपले भविष्य उज्ज्वल होईल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे असे विचार उपप्राचार्य प्रा. संभाजीराव शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी केले. याप्रसंगी प्रा. आबासाहेब इंगवले, प्रा. एम ए हाके, स्वप्नील शिंदे, दत्तात्रय भजनावळे आणि नियोजन कमिटीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे यांचेसह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments