स्व . सौ रोहिणी रवींद्र जाधव स्मारक ट्रस्ट, दौंड जि. पुणे यांच्यातर्फे उमा महाविद्यालयाचे अधीक्षक मा. शशिकांत दुनाखे यांना यावर्षीचा "रक्तदाता पुरस्कार 2020" प्रदान करण्यात आला. शतकोत्तर रक्तदानाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. प्रशस्तीपत्रक, मानपत्र देऊन दौंड येथे सत्कार करण्यात आला. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र जाधव, सदस्य डॉ. भट्टड डॉ राजेंद्र माने, डॉ. मुनोत इत्यादी सदस्य उपस्थित होते.
उमा महाविद्यालय ,पंढरपूर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकरपंत परिचारक यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले . शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे अभिनंदन केले .


0 Comments