पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात


Pandharpur Live-
सिंहगड काॅलेजचे उत्कृष्ट शिक्षण, नियोजन विद्यार्थ्यांना घडवत आहे
          - प्रा. अर्चना देशपांडे

पंढरपूर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ज्या अद्ययावत सुविधा हव्या असतात त्या सेवा- सुविधा पंढरपूर सिंहगड काॅलेज अगदी उत्कृष्ट पद्धतीने दिल्या जातात. विद्यार्थ्यांनी बारा-बारा तास अभ्यास करून नामांकित कंपनीत विद्यार्थी निवड झाले आहेत. या यशा पाठिमागे महाविद्यालयातील शिक्षकांबरोबर पालकांचा मोलाचा वाटा आहे. सिंहगड काॅलेज मध्ये सर्व सुविधा उत्तम प्रकारे दिल्या जातात हे मी अनुभवलं आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडविण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य कैलाश करांडे सह सर्वच कर्मचारी अगदी विश्वासाने मेहनत घेत आहेत. या महाविद्यालयात शिस्तीचे पालन केले जाते त्यामुळे सुसंस्कृत विद्यार्थी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात घडत असल्याचे मत पालक प्रतिनिधी प्रा. अर्चना देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.


    कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी २५ फेब्रुवारी २०२० रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, पालक प्रतिनिधी अतुल मेनकुदळे व प्रा. अर्चना देशपांडे, अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ चेतन पिसे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


   शैक्षणिक प्रगतीसाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच सामाजिक क्षेञात दिले जाणारे योगदान हे महत्वपूर्ण असते. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या विविध सेवा-सुविधा, शैक्षणिक प्रगती अहवाल, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांची होत असलेली निवड प्रक्रिया, सामाजिक उपक्रम अशा विविध सुविधांची माहिती प्रा. समीर कटेकर यांनी उपस्थित पालकांना स्क्रीन द्वारे दिली.


     या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी अतुल मेनकुदळे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व प्रा. अर्चना देशपांडे यांचा प्रा. सुधा सुरवसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
     अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उंतुग झेप घेतली असुन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी जागृत असण्याची गरज असल्याचा मत अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी डाॅ. श्याम कुलकर्णी, पालक प्रतिनिधी उद्योजक अतुल मेनकुदळे,पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव आदींनी मनोगत व्यक्त केले.
   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. प्रत्येक वर्षी प्रत्येक विभागाचा निकाल वाढत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी इच्छा शक्ती प्रबळ ठेऊन प्रयत्न केले तर यश निश्चित मिळत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी दररोज ५-६ तास व शनिवार, रविवार समुह चर्चात्मक अभ्यास करतात त्यामुळे विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होते. पालकांनी ही आपल्या पाल्यासाठी महाविद्यालयात येऊन शैक्षणिक गुणवत्ता पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी पालकांनी सहकार्य आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
    या पालक मेळाव्यात सहभागी पालकांना अल्पोपहार देण्यात आला. या मेळाव्याचे सुञसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अमित भादुले यांनी मानले.

फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मधील पालक मेळाव्यात बोलताना पालक प्रतिनिधी अर्चना देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

Post a Comment

0 Comments