पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथील रस्त्याचे काम होतेय निकृष्ट दर्जाचे

Pndharpur Live-
पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागेउंबरे पागे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  ते जगतापवस्ती या मार्गाचे डांबरीकरण करणेचे काम शासनाकडून मंजूर झाले आहे. परंतु या मार्गाचे काम संबंधीत खंत्राटदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतोय.

पंढरपूर लाईव्हला मिळालेल्या माहितीनुसार सदर मार्गावरील खडी तशीच उघडी आहे  व मुरुम न टाकता काळी माती टाकली जातेय. या निकृष्ट कामास ग्रामस्थांनी विरोध केला तरीही त्यांच्या विरोधाला न जुमानता ग्रामसेवक व कंत्राटदाराच्या मिलीभगती ने निकृष्ट दर्जाचे काम सुरुच आहे.

सदर कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी व मंजुरीनुसार दर्जेदार काम व्हावे अशी मागणी होत आहे. अन्यथा हे काम जर असेच चालु राहिले तर सार्वजनीक बांधकाम विभाग पंढरपुर आणि जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊ. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments