Pandharpur Live डीव्हीपी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा, सुप्रसिध्द उद्योजक अभिजीत पाटील यांनी कोरोना विषाणुच्या संकटकाळात रात्रंदिवस प्रामाणिकपणे सेवा बजावणार्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महसुल अधिकारी कर्मचारी व पत्रकारांना नाष्ट्यासह दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, जगाप्रमाणे आपल्या
देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आपल्या देश व महाराष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे,तसेच डॉक्टर,नर्सेस, पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी, पत्रकार मित्र आपले कर्तव्य बजावत आहेत, आपले कर्तव्य म्हणून डी.व्ही.पी. उद्योग समुहाकडुन ‘फुल ना फुलाची पाकळी’ असा सहयोग देत आहोत. पंढरपूर मधील हॉटेल विठ्ठल कामत मधुन सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवणाचे पार्सल कृपया इथून घेऊन जावे. असे आवाहन करतानाच
‘‘देश संकटात आहे जबाबदार नागरिक म्हणून हे माझं कर्तव्य..!!’’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.

