पंढरपूर लाईव्ह-
तुम्हाला साखर कारखान्याचे संचालक बनवतो, गुंतवलेली रक्कम शंभर पटीने वाढवून देतो अशा थापा मारून पुण्यातील एका भामट्याने पंढरीतील अनेकांना 24 लाख 69 हजारांचा गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार:-उध्दव गोवर्धन कौलगे, वय 50 वर्षे, धंदा-शेती, रा-पिराची कुरोली ता पंढरपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शाम हब्बू राठोड रा पूणे सध्या सोलापूर याचेविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणेत भादंविक.420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
गेली आठ महीन्यापूर्वी पासून तसेच दि 15/10/2019 रोजी ते दि 29/02/2020 रोजी पावेतो वेळोवेळी,मनोज कासेगावकर यांचे दुकानात पंढरपूर येथे आरोपीने गून्ह्यातील फसवणूकीचे रक्कम:- एकुण 24,69,100/- रू येणे एवढी रक्कम खालीलप्रमाणे घेतले.
1)4,34,000/- रू उध्दव गोवर्धन कौलगे यांचे घेतले,
2)45,000/- रू मनोज सुधाकर कासेगावकर यांचे घेतले
3) 4,85,000/- रू दिपकगिर नंदलालगिर गोसावी यांचे घेतले
4) 2,91,000/- रू उल्हास दगडु ढेरे यांचे घेतले
5)2,91,000/- रू वसंत ईश्वर रूपनर यांचे घेतले,
6) 97,000/- रू परमेश्वर किसन सरगर यांचे घेतले ,
7)97,000/- रू कैलास मुकुंद करंडे यांचे घेतले,
8)97,000/- रू महादेव संदिपान कवडे यांचे घेतले,
9)97,000/- रू बाळासाहेब दादासाहेब कदम यांचे घेतले
10)3,41,100/- रू अनिल श्रीमंत जाधव यांचे घेतले,
11) 97,000/- रू सोनप्पा भिमाशंकर भागानगरे यांचे घेतले
12)97,000/- रू आप्पासाहेब दुर्योधन भोईरकर यांचे घेतले
आरोपीने तो स्वत: श्री तिरूपती बालाजी सहकारी साखर कारखाना प्रा.ली इचलकरंजी, इचलकरंजी- पंढरपूर रोड,इचलकरंजी जि कोल्हापूर या नावाने काढणार आहे असे खोटे सांगून सदर साखर कारखान्यावर तुमची संचालकपदी नियुक्ती करणेबाबत आपणाकडील पाच खातेदार व त्यांचे बायोडेटा कागदपत्र आम्हास दया, त्यांना संचालक पदी निवड करतो असे सांगीतल्या वरून दि 12/02/2020 रोजी दिपकगिर नंदलालगिर गोसावी, उल्हास दगडु ढेरे, वसंत ईश्वर रूपनर, पांडुरंग शंकर शिंदे, सौ.साधना मनोज कासेगावकर सर्व रा पंढरपूर आमीष दाखवून त्यांची कागदपत्रे फोटो सह घेतलेली असून तसेच यातील आरोपीने गेली आठ महीन्यापूर्वी पासून तसेच दि 15/10/2019 रोजी ते दि 29/02/2020 रोजी पावेतो वेळोवेळी फिर्यादीस एक टक्का रक्कम भरल्या नंतर रक्कमेच्या शंभर पट तुम्हास कर्ज देतो असे पटवून भासवून विश्वास संपादन करून आरोपी नामे शाम हब्बू राठोड रा पूणे सध्या सोलापूर याने फिर्यादीची व फि"च्या सहका-यांची 24,69,100/- रूपयाची फसवणूक केली आहे. अधिक तपास सपोनि गायकवाड हे करत आहेत.
0 Comments