पंढरपूर सिंहगड मध्ये "जाॅमेट्रीक डायमेनसनिंग अँड टाॅलरन्सिग" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.श्रीनिवास संत समोर उपस्थित विद्यार्थी वर्ग.


 Pandharpur Live-

पंढपूर सिंहगड मध्ये "जाॅमेट्रीक डायमेनसनिंग अँड टाॅलरन्सिग" या विषयावर व्याख्यान                  पंढरपूर प्रतिनिधी :- एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी (ता. पंढरपूर) कोर्टी (ता. पंढरपूर) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रा. श्रीनिवास संत यांचे "जाॅमेट्रीक डायमेनसनिंग अँड टाॅलरन्सिग" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 यावेळी प्रा. श्रीनिवास संत यांच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.

   यावेळी प्रा. श्रीनिवास संत यांनी विद्यार्थ्यांना "जाॅमेट्रीक डायमेनसनिंग अँड टाॅलरन्सिग" या विषयावर महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम, प्रा. चंद्रकांत पवार, प्रा. योगेश शिंदे आदीसह अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी केले.                                                                                                                                                                                                       

Post a Comment

0 Comments