कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर इतिहासात प्रथमच भुवैकुंठ पंढरीत भरणारी मोठी चैत्री वारी रद्द करण्याचा निर्नय घेण्यात आला आहे. या वारीनिमित्त कोणत्याही वारकरी, भाविक भक्तानी पंढरीत येवु नये. असे आवाहन श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर दि.17/03/2020 ते दि.31/03/2020 या कालावधीत भाविकांना दशर्र्नासाठी बंद करण्यात आलेले आहे.
दि.04/04/2020 रोजी चैत्री यात्रा भरत असून, या यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक महाराश्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने दि.14/04/2020 पर्यत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास मा. राज्य षासनाने बंदी घातली आहे, अशा पार्श्वभूमीवर एवढया मोठया प्रमाणावर पंढरपूरात भाविक आले तर, कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने दि.04/04/2020 रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील.
त्यामुळे प्रतिवषार्र्प्रमाणे परंपरंनेनुसार येणााया सर्व दिंडया व सर्व पायी येणााया वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने व दि.14/04/2020 पर्यंत श्री. विल रूक्मिणी मंदिर दशर्र्नासाठी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने कृपया कोणीही श्रीक्षेत्र पंढरपूरला येऊ नये. असे नम्र आवाहन श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

