दिनांक:१३ एप्रिल २०२०
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग एक युद्ध लढत आहे. या जागतिक युद्धामध्ये आपल्या देशासाठी आपला महाराष्ट्रसुद्धा भक्कम पाय रोवून उभा आहे. सध्या कोरोनाच्या भीषण संकटामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा विचार करून राज्य व केंद्र शासनाकडून आपल्याच सुरक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या आदेशांचं पालन आपण केलंच पाहिजे.
महाराष्ट्रामधील विविध सामाजिक संस्थांमार्फत “मान मराठी मनाचा” हा महासन्मान सोहळा येत्या २५ एप्रिल २०२० रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, क्रीडा पुरस्कार, आदिशक्ती राजमाता पुरस्कार आदी अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार होते. या महासन्मान सोहळ्याच्या पूर्वप्रसिद्धीसाठी आपण आत्तापर्यंत दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू.
सध्या आपल्या देशावर आलेलं हे कोरोनारुपी महासंकट संपेपर्यंत या महासन्मान सोहळ्याचे आयोजन आम्हाला पुढे ढकलावे लागत आहे. सर्व काही सुरळीत होऊन परिस्थिती पूर्वपदावर येताच, पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

