पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व पीएसपी आय पी असोसियट्स यांच्या मध्ये सामजंस्य करार


Pandharpur Live -
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संशोधनास चालना मिळावी म्हणून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व पीएसपी आय पी असोसियट्स यांच्या मध्ये सामजंस्य करार करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
संपुर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व पीएसपी आय पी असोसियट्स यांच्या मध्ये ऑनलाईन पद्धतीने सामजंस्य करार करण्यात आला असुन या करारा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना पेटंट घेण्यासाठी, शोध प्रकल्प करण्यासाठी इनक्यबेशन डेव्हेल करण्यासाठी  मदत होणार आहे. पी एस पी आय पी असोसियट्स या कंपनीचे डाॅ. सूर्यकांत पाटील हे डायरेक्टर असुन ते पेटंट अॅटाॅर्नी म्हणून युरोपियन व आशियन देशांमध्ये काम पाहत आहेत. पीसीटी माध्यमातून पेटंट चे काम १५४ देशांमध्ये चालते.

    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत असून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्याला वाव देण्यासाठी व त्यांच्यातील कलाकौशल्य गुण ओळखुन त्यांना शिक्षण देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे. पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच उंतुग घेऊन नावलौकिक मिळविलेल्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून भविष्यात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन संशोधन व्हावे यासाठी महाविद्यालय सामजंस्य करार करीत आहे. या करारामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन वृत्तीला खुप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

      या सामजंस्य करार अंतर्गत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना एक माध्यम मिळणार असुन प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळून त्यांच्या अंगभुत असलेल्या कौशल्याचा वापर करून स्वतःची कल्पना शक्ती वापरून उद्योग निर्मितीसाठी या कराराचा खुप मोठा फायदा होणार असल्याचे अधिष्ठाता डाॅ.स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे.


Post a Comment

0 Comments