Pandharpur Live - सोलापूर, दि.5- कोरोना प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून शासनाच्या दिनांक 14 जून 2020 रोजीच्या नवीन सुधारित पत्रानुसार शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या कार्यालयीन कामकाजासाठी परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु! जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने 31 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये लागू असलेले कोरोना प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवून शासनाच्या नवीन पत्रानुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्यास परवानगी दिली जात आहे. यामध्ये विद्यापीठे महाविद्यालये, शाळा यांचे कार्यालय सुरू होतील. केवळ कर्मचारी उपस्थित राहून काम करतील. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल जाहीर करणे, ई सामग्रीचा विकास, त्याचबरोबर नॉन टीचिंगच्या उद्देशाने कामकाज करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
शैक्षणिक वर्षाची तयारी ठेवा
शाळा-कॉलेज सुरू होण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जाती दाखला, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आदी विविध कागदपत्रे लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्याकडून त्यांनी यावेळी शाळा सुरू करण्यासंदर्भात माहिती जाणून घेतली. ऑनलाइन अभ्यास व शिक्षण या संदर्भातील त्यांनी आढावा घेतला.


0 Comments