सोलापूर, दि.5- शहर व जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे उपयोजना राबवा, अशा सूचना पालक सचिव अतुल पाटणे यांनी आज जिल्हा प्रशासनाला केल्या.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
पालक सचिव पाटणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी व्हीसीव्दारे संवाद साधला.
पाटणे म्हणाले की, शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावीपणे पावले उचलणे अपेक्षित आहे. आता नागरिक घराबाहेर पडतील, दुकाने सुरू होतील त्यामध्ये पावसाळा सुरू होत असल्याने वेळीच दक्षता घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा. नागरिकांनी कोरोना संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, यासाठी विशिष्ट कार्यक्रम हाती घ्या, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. सरकारी रुग्णालयांवर ताण पडत असल्याने खासगी दवाखाने कोविड, नॉन कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ, पोलीस आयुक्त शिंदे यांनी आपल्या ऑफिसमधून व्हीसी मध्ये सहभाग घेतला.


0 Comments