पंढरपूर.दि.08 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची खते व बियाणे खरेदीसाठी दुकानामध्ये गर्दी होऊ नये म्हणून शेतकयांच्या बांधावर खते व बियाणे पुरविण्याची मोहिम कृषी विभागामार्फत हाती घेण्यात आली असून, कृषी विभागामार्फत शेतकरी गट व कृषी कंपन्या व बचत गटांच्या माध्यमातून खते बियाणे वाटप करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी आर. एन. कांबळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी तसेच गुणवत्तापुर्ण व प्रमाणित बी-बीयाणे, खते शेतक-यांना मिळावे यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. खरीप हंगामात खते, बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे मिळावे तसेच शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी व दर्जेदार तसेच प्रमाणित बियाणे, खते मिळावे यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक प्रयत्न केले जात असल्याचेही उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे यांनी यावेळी सांगितले .
बांधावर खते व बियाणे पुरविण्याची मोहिमेच्या अनुषंगाने तालुक्यातील पळशी व उंबरगांव येथे 2 हजार 250 किलो मका बियाणे कृषी विभागाच्या व महिला बचत गटाच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे. यावेळी कृषी मंडळ अधिकारी श्री.सरडे यांनी मका या पिकावरील अमेरिकन अळीच्या नुकसानी पासूण बचाव करण्यासाठी कोणती औषधे वापरावीत याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


0 Comments