पत्रकार संरक्षण समिती पंढरपूरच्या पत्रकारांना लॉकडाऊन काळात तिसर्‍यांदा जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप

Pandharpur Live -
 l
पंढरपूर (प्रतिनिधी):-पत्रकार संरक्षण समिती पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना दि. 7 जुन 2020 रोजी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यातही जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तुर दाळ, पोहे, संतुर साबण, गोडे तेल, खोबरेल तेल, चहा पावडर , शेंगदाणा, रवा, सर्फ एक्सेल पावडर, चॉकलेट बरणी, गहु, तांदुळ असा मुबलक किराणा माल व अत्यावश्यक वस्तु देण्यात आल्या. यावेळी श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे यांनी सर्वांना एक आठवडा पुरेल एवढा ताजा भाजीपाला दिला.


अत्यावश्यक वस्तु व किराणा मालासाठी पंढरीतील सुप्रसिध्द बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा,   पंढरपूर मंगळवेढा  मतदार संघ शिवसेना समन्वयक तथा पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके, पंढरपूर नगरपरिषदेचे आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, करकंब ग्रामपंचायतीचे सरपंच आदिनाथ देशमुख, समाजसेवक जयसिंग भुसनर, समाजसेवक गणेश कदम यांचे सहकार्य लाभले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
श्रीविठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख समाजसेवक ओंकार बसवंती, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ.आरती बसवंती यांच्या उपस्थितीमध्ये शिवयोगी मंगल कार्यालय लिंक रोड, पंढरपूर येथे सोशल डिस्टन्स राखुन हे वितरण करण्यात आले. 
पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पंढरपूर शहराध्यक्ष श्रीकांत कसबे, कार्याध्यक्ष झाकीर नदाफ, उपाध्यक्ष उमेश टोमके, तानाजी जाधव, सचिव लखन साळुंखे, खजिनदार अशोक पवार, प्रसिद्धीप्रमुख संजय हेगडे, सदस्य डॉ. राजेश फडे, शंकरराव कदम, गौतम जाधव, संतोष कांबळे, लक्ष्मण जाधव, शंकर पवार, आनंद भोसले, धीरज साळुंखे, प्रकाश इंगोले, डॉ. एस.एस.पाटोळे,  सचिन दळवी, शरद कारटकर, नामदेव लकडे यांनी हे अन्नधान्य वितरणासाठी प्रयत्न केले. यावेळी सहसचिव जैनुद्दीन मुलाणी, सदस्य विरेंद्रसिंह उत्पात, डॉ. संजय रणदिवे, नंदकुमार देशपांडे, तानाजी सुतकर आदी उपस्थित होते. 
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश लॉकडाऊन आहे. याचा परिणाम सर्वांच्याच दैनंदीन जीवनमानावर घडलेला आहे. या काळात पत्रकार बांधवांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत. पत्रकार बांधवांना कांही अंशी दिलासा मिळावा यासाठी दैनंदीन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तुंचे तिसर्‍या टप्प्यातील वाटप आज करण्यात आले. पुढील काळातही आवश्यकतेनुसार सर्वांना मदत केली जाईल. अशी माहिती यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी दिली. पत्रकार बांधवांनी आपले काम करताना स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क, सॅनेटायझर्सचे वापरासह सोशल डिस्टक्शनचा अवलंब करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments