Pandharpur Live - l
पंढरपूर:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणी मातेची चंदन उटीपुजा दि.25/03/2020 ते दि.08/06/2020 या कालावधीत संपन्न झाली. या चंदनउटी पुजेची सांगता पुजा आज मंगळवार, दि.09/06/2020 रोजी श्री.विठ्ठलाकडे पुजा करणारे पुजारी श्री.महेश रामचंद्र पुजारी व श्री.रूक्मिणी मातेकडे पुजा करणारे पुजारी श्री.प्रसाद दिलीप दशपुत्रे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी व व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!सद्यस्थितीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता, तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.17/03/2020 ते दि.30/06/2020 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे होणार्या श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीची चंदनउटी पुजा भाविकांना उपलब्ध करून न देता, मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या आहेत.





0 Comments