स्मशानभूमीत काम करणारा किंवा अग्नी देणारा कर्मचारी हा बहुतांश करून मसनजोगी समाजाचा असतो. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता अग्नी देण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणून या कर्मचार्यांच्या ताब्यात दिला जातो.
मात्र केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यांना पीपीई किट दिले जाते. मात्र स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण (पीपीई) किट का दिले जात नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
औरंगाबाद येथे स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगी समाजाच्या १७ लोकांना कोरोना झाला आहे. असे अनेक उदाहरण देता येईल असे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिले जाते तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट का दिले जात नाही. माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट द्यावे, असं आंबेडकर म्हणाले.
0 Comments