कोरोनामुक्तीच्या वाटेवरील पंढरीत 2 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

Pandharpur Live -
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कांही तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच पंढरपूर शहर व तालुका मात्र येथील प्रशासकीय यंत्रणेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच आज पंढरीतील एका 2 वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
 Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

याबाबत समजलेले वृत्त असे की, ‘टोकिओ’  या परदेशातुन 30 मे रोजी एक कुटुंब पंढरीतील भक्तीमार्गावरील एका निवासस्थानात वास्तव्यास आले होते. परदेशातून आलेल्या तिघाजणांच्या या कुटुंबातील आई-वडीलांचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाय मात्र यांच्या 2 वर्षाच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट  पॉझिटीव्ह आलाय.

पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आल्याबरोबर पुढील उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंणत्रणा सज्ज झाली असुन संबंधीत भाग सील करणे, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे व पुढील प्रतिबंमधात्मक कार्यवाही करणेसंबंधीचे काम प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. असे समजते.

Post a Comment

0 Comments