पंढरपूर- घरमालक आणि मठाधिपतींनी भाविकांना रहाण्याची सोय केली तर दाखल होणार गुन्हा - मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर


Pandharpur Live -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी वारीत सुध्दा भाविकांना पंढरपूरमध्ये येण्यास बंदी आहे. परंतु काही भाविक व महाराज मंडळी पंढरीत येत असल्याचे निदर्शनास आल्याने पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी काल पंढरीतील एका मठात कुटुंबासह बाहेरगावाहून आलेल्या  महाराजांना पंढरपूरच्या बाहेर नेऊन गांधीगिरी पध्दतीने सत्कार करून त्यांना गावाकडे रवाना केले. यानंतर "यापुढे जर पंढरपूर मधील मठाधिपतींनी वारकरी भाविकांना आपल्याकडे आसरा दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिला आहे."

अशीही गांधीगिरी- पंढरपूर शहरात आलेले कुकरमुंडे महाराज यांना सन्मानाने गावाच्या बाहेर पाठवले
 पंढरपूर नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी   शहरातील 450 मठधारकांनी  आपल्या मठांमध्ये इमारती मध्ये कोणत्याही बाहेर गांवावरून आलेल्या नागरिकांना वारकऱ्यांना प्रवेश देऊ नये अथवा वास्तव्यास ठेवू नये जर ठेवल्यास तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन 2005 अंतर्गत कारवाई केली जाईल अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तरीही काही महाराज मंडळी व वारकरी आजही पंढरपूर मध्ये दाखल होत आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
 काल सकाळीच नंदू महाराज कुकरमुंडे हे पंढरपुर शहरात त्यांचे मठात दाखल झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना मिळाली सदरची  माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी  सचिन ढोले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दूरध्वनीद्वारे कुकरमुंडे  महाराज यांचेशी  संपर्क साधला व सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण पंढरपूर शहरामध्ये राहू नये अशी विनंती केली.

 सदर विनंती कुकरमुंडे महाराज यांनी मान्य केली परुंतु  मी आज पंढरपूर शहर सोडत असल्याचे सांगितले त्यावर पंढरपूर नगरपरिषद  चे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर ,उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी समक्ष कुकरमुंडे महाराज मठात जाऊन त्यांची भेट घेतली आपण आमची सूचना मान्य केली आहे त्याबद्दल आभारी आहे  तरी आपण त्वरित शहराचे बाहेर जाण्यासाठी निघावे  अशी विनंती केली त्यांनी ही लगेच प्रतिसाद देत कुटुंबातील सदस्यासह मठाचे बाहेर पडले.   त्यांना सन्मानाने पंढरपूर शहराच्या बाहेर असलेल्या अहिल्या  पुलाच्या तपासणी नाक्याजवळ नेऊन  त्या ठिकाणी सन्मानपूर्वक त्यांना हार देऊन त्यांचा सन्मान मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केला. आणि यापुढे पंढरपूर शहरांमध्ये आपण व आपले कोणतेही भावीक पाठवू नयेत अशी विनंती केली. त्यानंतर  नंदकुमार कुकरमुंडे महाराज हे आपल्या  नंदुरबार या मूळ गावी परत निघून गेले.

 अशा प्रकारे पंढरपूर नगर परिषदेने गांधीगिरी करत संबंधित महाराज मंडळींना  सन्मानानं गावाच्या बाहेर पाठवण्याची भूमिका घेतली. यावेळी बोलताना मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले की, नगरपरिषद ने   मठ व इमारती चे निगराणी करणेसाठी  36 कर्मचारी चे निगराणी पथक तयार  केले आहेत सदर निगराणी पथक वेळोवेळी या संबंधित मठांना इमारतींना भेटी देत आहेत   जर या निगराणी पथकास एखाद्या मठाधिपती आणि किंवा इमारत मालकांनी भाविकांना वास्तव्यासाठी जागा दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मठाधिपती किंवा इमारत मालक यांचे वर  आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments